+९१ ७४००१५१५३१

आमच्या बद्दल माहिती

प्रा. ना. दुं. हायस्कूल माजी विद्धार्थी कल्याण मंडळ

माजी विद्यार्थी कल्याण मंडळ हे प्रा. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेले एक संस्था आहे. या मंडळाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासात मदत करणे हा आहे. मंडळाने आपल्या कामगिरीद्वारे शाळेच्या विकासात तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले आहे.

हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, सामाजिक, आणि क्रीडा क्षेत्रात नवी दिशा आणि संधी उपलब्ध करून देणे हा मंडळाचा मुख्य हेतू आहे. आज मंडळाने शाळेसाठी विविध मदत कार्य, आर्थिक सहाय्य, आणि साधनसंपत्ती उपलब्ध करून दिली आहे.

प्रा. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल माजी विद्यार्थी कल्याण मंडळाचा उद्देश आहे की, शाळेतील प्रत्येक विद्यार्थी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करू शकेल..

प्रा. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल माजी विद्यार्थी कल्याण मंडळ ( मलतवाडी )

आम्ही काय काम करतो ?

दर्जेदार शिक्षण

दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देऊन, त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि सामर्थ्यशाली बनवणे.

सांस्कृतिक कार्यक्रम

आम्ही शिक्षार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो, ज्यामध्ये सांस्कृतिक क्रीडा, संगीत, नाट्य, विविध कलाकृती, वाचनिक कार्यक्रम आणि प्रस्तुतीचा आयोजन केला जातो.

करिअर मार्गदर्शन

आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन प्रदान करतो.

समाजकल्याण

माजी विद्यार्थी संघटनेच्या मदतीने समाजकल्याणाच्या कार्यात महत्वपूर्ण काम करणे.

प्रा. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल (मलतवाडी)

प्राध्यापक नामदेवराव दुंडगेकर हायस्कूलची स्थापना १९८५ साली मलतवाडी येथे झाली. शाळेने १९८५ मध्ये इयत्ता आठवीचा पहिला वर्ग सुरू केला. त्यानंतर, १९८६ साली आठवी आणि नववीचे दोन वर्ग चालू करण्यात आले. १९८७ साली इयत्ता आठवी, नववी, आणि दहावीचे तीन वर्ग सुरू करण्यात आले आणि त्या वर्षी हायस्कूलने खऱ्या अर्थाने माध्यमिक शाळेचा आकार घेतला.

१९८७-८८ मध्ये या शाळेची पहिली दहावीची बॅच पास होऊन बाहेर पडली. तेव्हापासून २०२४ पर्यंत सतत ३६ बॅचेस इयत्ता दहावीच्या परीक्षा देऊन बाहेर पडल्या आहेत. सुरुवातीच्या प्रत्येक बॅचमध्ये सरासरी २५ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी धरल्यास अंदाजे ९०० मुले आणि मुली या शाळेतून बाहेर पडले आहेत.

द किणी कर्यात शिक्षण संस्थेचे मलतवाडी हायस्कूल हे "ज्ञान, विज्ञान, आणि सुसंस्कार" हे ब्रीदवाक्य घेत अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करत आहे आणि त्यांना घडवत आहे.

प्रा. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल माजी विद्यार्थी कल्याण मंडळाची स्थापना

२६ जानेवारी १९९८ रोजी प्राध्यापक नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल, मलतवाडीच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा उगम २५ जानेवारी १९९८ रोजी संध्याकाळी, डिलाईल रोड येथील ग्रामस्थ मंडळ १७/५५ आणि १७/५७ या दोन खोल्यांमध्ये गप्पा मारत बसलेल्या काही विद्यार्थ्यांमध्ये झाला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या शाळेसाठी काही करावे, अशी इच्छा व्यक्त केली. मुंबईत माजी विद्यार्थी संघटनांचे विद्यार्थ्यांसाठी होणारे प्रयत्न पाहून त्यांना प्रेरणा मिळाली होती.

  • शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी प्रेम आणि आपुलकी असणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्यात शैक्षणिक आणि नैतिक मूल्यांची वृद्धी करणे.
  • विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्यायांच्या दिशेने योग्य मार्गदर्शन आणि माहिती प्रदान करण्यासाठी उपक्रम राबविणे.
  • विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रात सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देणे.
  • हुशार, होतकरू परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य आणि प्रोत्साहन देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे.
  • शैक्षणिक दर्जा उत्तम राखण्यासाठी आधुनिक शिक्षण पद्धती आणि साधनसंपत्तीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण प्रदान करणे.
  • विविध क्षेत्रात विशेष यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सन्मान विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करणे.
  • माजी विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सभासदांच्या संघटित शक्तीचा उपयोग करून सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात योगदान देणे.

माजी विद्यार्थी कल्याण मंडळाने आजतागायत अनेक गोष्टींवर काम केले आहे

  • बक्षीस वितरण: माजी विद्यार्थी कल्याण मंडळ स्थापन झाल्यानंतर दरवर्षी नियमितपणे विद्यार्थ्यांना विविध बक्षीसांचे वितरण केले जाते. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देतो.
  • शाळेच्या गेटचे बांधकाम: हायस्कूल समोरच्या बाजूला गेट नव्हते; मंडळाने या गेटच्या बांधकामाचा संपूर्ण आर्थिक भार उचलला आहे, ज्यामुळे शाळेचा प्रवेश अधिक सुरक्षित झाला आहे.
  • अभ्यासिके साठी इन्व्हर्टर: प्रारंभिक काळात विजेची सुविधा उपलब्ध नसताना मंडळाने रात्रीच्या अभ्यासिके साठी इन्व्हर्टर प्रदान करून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत केली आहे.
  • ग्रंथालय आणि प्रयोगशाळा: मंडळाने हायस्कूलच्या वाचनालयासाठी अनेक पुस्तकांची देणगी दिली आणि ग्रंथालय व प्रयोगशाळा यांचे फर्निचर पुरवले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक साधनसंपत्ती मिळाली आहे.
  • क्रीडा साहित्य: विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हायस्कूलला आवश्यक क्रीडा साहित्य पुरवून मदत केली आहे.
  • संस्था नोंदणी: दि. २४ ऑक्टोबर २०१७ रोजी, संस्था नोंदणी अधिनियम १८६० (१८६० चा अधिनियम २१) अन्वये माजी विद्यार्थी कल्याण मंडळाची रीतसर नोंदणी करण्यात आली आहे, ज्यामुळे संघटनेला कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
  • स्नेह मेळावा आणि स्नेहभोजन: दि. १५ मे २०२२ रोजी, १९८८ पासून ते २०२२ पर्यंत हायस्कूलमधून बाहेर पडलेल्या ३४ बॅचचा आणि आजी-माजी शिक्षकांचा भव्य दिव्य स्नेह मेळावा आणि स्नेहभोजनाचे आयोजन केले.
  • पत्राशेड बांधणी: मंडळाने हायस्कूलच्या इमारतीवरील पत्राशेड बांधून दिले आहे, तसेच दुरुस्ती करून दिली आहे.
  • प्राथमिक शिक्षण सुधारणा: गावातील माध्यमिक शिक्षण दर्जेदार होण्यासाठी प्राथमिक शिक्षण चांगले व्हावे यासाठी व्हलवली प्राथमिक शाळेकडे लक्ष घालून सुधारणा करण्याचा मानस आहे.
  • गावाचा विकास: माजी विद्यार्थी कल्याण मंडळाने आज पर्यंत प्रसंगानुरूप तथा गावच्या विकासासाठी सदैव तत्पर राहून सहभाग घेतला आहे.

अभिप्राय

आमचे संचालक मंडळ

Team Image

अध्यक्ष

Team Image

उपाध्यक्ष

Team Image

खजिनदार

Team Image

सेक्रेटरी

Team Image

सभासद

Team Image

सभासद

Team Image

सभासद

Team Image

सभासद

Team Image

सभासद

Team Image

सभासद

Team Image

सभासद

Team Image

सभासद

Team Image

सभासद

Team Image

सभासद

Team Image

सभासद